डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त कोल्हापुरात लाभार्थ्यांना साहित्य वाटप
कोल्हापूर येथे सामाजिक न्याय विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध योजनांतील लाभार्थ्यांना साहित्य व आर्थिक सहाय्याचे वाटप करण्यात आले.
कोल्हापूर, दि. ९ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजनांतील लाभार्थ्यांना साहित्य व आर्थिक सहाय्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम विचारे माळ येथील समाज कल्याण कार्यालयात पार पडला.
या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सुनिता नेर्लीकर, समाज कल्याण अधिकारी अक्षय कुरणे, जात पडताळणी संशोधन अधिकारी संभाजी पवार, अधीक्षक सचिन पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
८ ते १४ एप्रिल या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या समता सप्ताहाच्या निमित्ताने विविध योजनांअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. यामध्ये १५ विद्यार्थ्यांना स्वाधार योजना प्रमाणपत्र, ५ विद्यार्थ्यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, तसेच शासकीय वसतीगृह व निवासी शाळेतील ४ विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात आले.
याशिवाय साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत श्रीमती आरती दबडे यांना कापड दुकानासाठी थेट कर्ज योजनेअंतर्गत १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तसेच रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या वितरित करण्यात आल्या. दोन बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यासोबत उपसाधनांचेही वाटप करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विद्रोही शाहीर रणजीत कांबळे यांनी “हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा” या विषयावर खुमासदार शैलीत भाष्य करत उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.
या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे कर्मचारी, लाभार्थी आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0