राष्ट्रीय महामार्गावर कार-दुचाकी अपघातानंतर भीषण आग; तीन जण गंभीर जखमी

बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर कार आणि दुचाकीच्या अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून मोठा अनर्थ टळला.

Apr 13, 2026 - 16:14
 0  6
राष्ट्रीय महामार्गावर कार-दुचाकी अपघातानंतर भीषण आग; तीन जण गंभीर जखमी
बुलढाणा अपघात, राष्ट्रीय महामार्ग 53

बुलढाणा (ब्यूरो): अमोल सराफ 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर वडनेर भोलजी ते धानोरा दरम्यान कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर काही मिनिटांतच दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याने घटनास्थळी भीषण परिस्थिती निर्माण झाली.

या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, अपघातानंतर काही क्षणांतच वाहनांना आग लागल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जळत्या वाहनांचा थरारक प्रसंग पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

सुदैवाने वाहनांतील प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस व आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. पुढील तपास सुरू आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0