मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी; परिमंडळ १० मधील ४१६ तक्रारदारांना २ कोटी ९३ लाखांचा मुद्देमाल परत

मुंबईतील पोलीस उप आयुक्त पश्चिम परिमंडळ १० अंतर्गत असलेल्या पोलीस ठाण्यांनी चोरी, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यातील २ कोटी ९३ लाख ५९ हजार ६४३ रुपये किमतीचा मुद्देमाल ४१६ तक्रारदारांना सन्मानपूर्वक परत केला.

मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी; परिमंडळ १० मधील ४१६ तक्रारदारांना २ कोटी ९३ लाखांचा मुद्देमाल परत
Mumbai Police News, Andheri Police, Property Handover Mumbai, Zone 10 Mumbai Police, मुंबई पोलीस बातम्या, मुद्देमाल हस्तांतरण, अंधेरी पोलीस, सायबर गुन्हे मुंबई

मुंबई ब्यूरो: अनिल सावरे 

बृहन्मुंबई पोलीस दलाच्या पश्चिम परिमंडळ १० अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनी एक मोठी कामगिरी बजावत तब्बल २ कोटी ९३ लाख ५९ हजार ६४३ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून ४१६ तक्रारदारांना सन्मानपूर्वक परत केला आहे. शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.०० ते ५.०० या वेळेत

 अंधेरी (पूर्व) येथील मरोळ मरोशी रोडवरील सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये हा विशेष मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम पार पडला. अंधेरी, एमआयडीसी, मेघवाडी, जोगेश्वरी, साकीनाका आणि पवई या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेले चोरी, गहाळ, फसवणूक तसेच सायबर गुन्ह्यांत गोठवलेली (फ्रीज केलेली) मालमत्ता पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या अथक परिश्रमातून हस्तगत करण्यात आली होती. आपला कष्टाचा ऐवज आणि रक्कम परत मिळाल्याने तक्रारदारांचा आनंद द्विगुणित झाला असून, अनेकांनी मुंबई पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक करत आभार मानले. हस्तांतरित करण्यात आलेल्या मुद्देमालाचा सविस्तर तपशील:

 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम:

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) डॉ. मनोजकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ १०) दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त योगेश शिंदे (अंधेरी विभाग), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र राणे (मेघवाडी विभाग) आणि सहायक पोलीस आयुक्त दादासाहेब घुटूकडे (साकीनाका विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.   

या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी (अंधेरी), घनश्याम नायर (एमआयडीसी), किरण शाळीग्राम (मेघवाडी), इक्बाल शिकलगार (जोगेश्वरी), अविनाश मांदळे (साकीनाका) आणि आत्माजी सावंत (पवई) यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक (प्रशासन), अधिकारी व अंमलदार यांनी मोलाची भूमिका बजावली.