नवी सांगवीत १४ मे रोजी भव्य रोजगार मेळावा; ५ हजारांहून अधिक पदांसाठी थेट भरती

नवी सांगवी येथे १४ मे रोजी आयोजित ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’मध्ये राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ५ हजारांहून अधिक पदांसाठी थेट भरती होणार आहे. विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या युवक-युवतींना ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.

May 12, 2026 - 03:46
 0  13
नवी सांगवीत १४ मे रोजी भव्य रोजगार मेळावा; ५ हजारांहून अधिक पदांसाठी थेट भरती
शंकर जगताप, रोजगार मेळावा, नवी सांगवी, पिंपरी चिंचवड

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. ११ : पिंपरी-चिंचवड परिसरातील बेरोजगार तरुण-तरुणींना राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी नवी सांगवी येथे ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग (पुणे), प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली.

नवी सांगवी येथील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल येथे सकाळी ९ वाजल्यापासून मेळाव्याला सुरुवात होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या हस्ते होणार आहे.

या रोजगार मेळाव्यात पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण तसेच राज्यातील विविध औद्योगिक पट्ट्यांतील आयटी, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल आणि बँकिंग क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी होणार असून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

पाचवी ते दहावी शिक्षण घेतलेले उमेदवार, बारावी उत्तीर्ण, पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय आणि डिप्लोमाधारक युवक-युवतींना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. उमेदवारांनी बायोडाटा आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या मेळाव्यातून ५ हजारांहून अधिक रिक्त पदांवर भरती केली जाणार असून सहभागी सर्व उमेदवारांना विशेष सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी ९९२१०९९२१४, ७३५००७९९५५ आणि ९८५०१७११११ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया

“युवकांना रोजगाराचे हक्काचे व्यासपीठ आणि दर्जेदार संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देऊन तरुणांच्या कौशल्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जास्तीत जास्त युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.”

— शंकर जगताप

(आमदार, चिंचवड विधानसभा)

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0