विधानपरिषदेत नवनिर्वाचित १० सदस्यांचा शपथविधी; सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते शपथ

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांनी आज विधान भवनात सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते पार पडलेल्या या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

May 14, 2026 - 19:42
May 14, 2026 - 19:43
 0  12
विधानपरिषदेत नवनिर्वाचित १० सदस्यांचा शपथविधी; सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते शपथ
विधानपरिषदेत नवनिर्वाचित १० सदस्यांचा शपथविधी; सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते शपथ

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित १० सदस्यांना विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज सदस्यत्वाची शपथ दिली. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात हा शपथविधी सोहळा पार पडला.

या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई तसेच आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आज शपथ घेणाऱ्या सदस्यांमध्ये डॉ. नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, झीशान झिआउद्दीन सिध्दीकी, माधवी संजय नाईक, सुनिल विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथ्थुजी भेंडे यांचा समावेश होता.

शपथविधीनंतर सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या

.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0