येरवडा खुले कारागृहात अमनोरा अचिव्हर्स चॅप्टरतर्फे वृक्षारोपण; 55 पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड
Saturday Club Global Trust अंतर्गत कार्यरत अमनोरा अचिव्हर्स चॅप्टरच्या वतीने येरवडा खुले कारागृह येथे वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या संदेशासह बहावा, मोहोगनी, बेल, कडुनिंब यांसह 55 वृक्षांची लागवड करण्यात आली.
मनिषा गुरव चीफ एडिटर
पुणे, दि. 20 : Saturday Club Global Trust (SCGT) अंतर्गत कार्यरत अमनोरा अचिव्हर्स चॅप्टरच्या वतीने येरवडा खुले कारागृह, येरवडा येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक श्री. शामकांत शेडगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच SCGT चे ईस्ट रिजन हेड श्री. राजेंद्र कोते, डेप्युटी रिजन हेड श्री. सूरज गायकवाड, अमनोरा अचिव्हर्स चॅप्टरच्या चेअरपर्सन सौ. माया तुळपुळे, सेक्रेटरी श्री. धनंजय तुळपुळे, श्री. सुधीर गांगर्डे (MDRT USA), ट्रेझरर श्री. सुमित मुगावे यांच्यासह विविध चॅप्टरचे पदाधिकारी, उद्योजक, कारागृह अधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपक्रमांतर्गत बहावा, मोहोगनी, बेल, कडुनिंब, कपूर, आपटा यांसह पर्यावरणपूरक अशा विविध प्रजातींच्या एकूण 55 वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षांमुळे कारागृह परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार आहे.
यावेळी अधीक्षक श्री. शामकांत शेडगे यांनी Saturday Club Global Trust च्या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान PCMC Elite चॅप्टरचे उद्योजक श्री. गिरीश देशमुख यांनी खुले कारागृहासाठी लॉन कटर मशीन भेट दिली. तसेच वृक्षांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी खराडी चॅप्टरचे श्री. अमोल सदानशिवे यांच्या माध्यमातून SCGT तर्फे सिंटेक्स पाण्याची टाकी उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अमनोरा अचिव्हर्स चॅप्टरचे सेक्रेटरी श्री. सुधीर गांगर्डे यांनी केले. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती, सामाजिक बांधिलकी आणि हरित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमात अमनोरा अचिव्हर्स चॅप्टरचे सुमारे 30 सदस्य, कारागृह कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0