बुलढाण्यात १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५१ उपकेंद्रे सुरू होणार – प्रतापराव जाधव

बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५१ उपकेंद्रे सुरू करण्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली.

Apr 23, 2026 - 14:08
 0  27
बुलढाण्यात १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व ५१ उपकेंद्रे सुरू होणार – प्रतापराव जाधव
बुलढाणा आरोग्य सेवा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, प्रतापराव जाधव, आरोग्य विभाग महाराष्ट्र, ग्रामीण आरोग्य सेवा, आयुष मंत्रालय,

बुलढाणा प्रतिनिधी महेंद्र मिश्रा 

केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेला मोठी चालना देणारी घोषणा केली आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जिल्ह्यात लवकरच १६ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ५१ उपकेंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी आरोग्य सेवा ही सर्वात मोठी सेवा असून ती सकारात्मक भावनेतून करावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेला केले.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, तसेच आरोग्य विभागातील विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील सध्याच्या आरोग्य सुविधांचा आढावा घेताना असे सांगण्यात आले की, बुलढाण्यात १ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, १ जिल्हा रुग्णालय, १ जिल्हा स्त्री रुग्णालय, १ जिल्हा क्षयरोग रुग्णालय, ३ सामान्य व उपजिल्हा रुग्णालये, १४ ग्रामीण रुग्णालये, ५७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २८२ उपकेंद्रे कार्यरत आहेत. याशिवाय १० ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आणि ४० नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे सुरू आहेत.

आरोग्य निर्देशांकाच्या बाबतीतही जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे. जन्मदर १३.९२, बालमृत्यू दर ८.०९ आणि माता मृत्यू दर २३ इतका कमी राखण्यात यश मिळाले आहे.

या नव्या आरोग्य केंद्रांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0