बुलढाण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; जयस्तंभ चौकात मध्यरात्री फटाक्यांची आतिषबाजी
बुलढाणा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जयस्तंभ चौकात मध्यरात्री फटाक्यांची आतिषबाजी, महिलांचा लेझीम नृत्य आणि जयघोषात अभिवादन.
बुलढाणा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
शहरातील जयस्तंभ चौक येथे सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली. यावेळी ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या कार्यक्रमात शेकडो समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिलांनी शुभ्र वस्त्रे परिधान करून आणि निळे फेटे बांधून लेझीम खेळत, जयघोष करत डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.
तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ११ एप्रिलपासून बुलढाणा शहरासह जिल्हाभरात विविध सामाजिक प्रबोधन आणि समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.
दरम्यान, जयंतीनिमित्त दिवसभर विविध अभिवादन कार्यक्रम, रॅली आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0