नारीशक्ती विधेयकामुळे महिलांना सन्मान; आमदार श्वेता महाले यांचे पंतप्रधान मोदींना आभार
महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या नारीशक्ती विधेयकाबद्दल चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
विदर्भ ब्यूरो| अमोल सराफ :
बुलढाणा: महिलांना सन्मान आणि अधिकार मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने मांडलेल्या नारीशक्ती विधेयकाचे सर्वत्र स्वागत होत असून, बुलढाण्यातील चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत.
सर्वोच्च सभागृहामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात आले आहे. यापूर्वी अनेक सरकारांनी केवळ घोषणा केल्या होत्या, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक प्रत्यक्षात मांडून महिलांप्रती आदर केवळ घोषणेतून नव्हे तर कृतीतून दाखवला आहे, असे आमदार श्वेता महाले यांनी सांगितले.
महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हा एक ऐतिहासिक निर्णय असून, यामुळे देशातील महिलांना राजकीय क्षेत्रात अधिक संधी मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या निर्णयामुळे महिलांचा सहभाग वाढून लोकशाही अधिक बळकट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0