घाटकोपरच्या लक्ष्मीनगर नाल्यात कचऱ्याचा ढिग; शिवसेना (उबाठा)चे धरणे आंदोलन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मीनगर नाल्यातील कचऱ्याच्या समस्येविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. पालिका प्रशासन नालेसफाईचे दावे करत असताना प्रत्यक्षात नाल्याची अवस्था गंभीर असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
मुंबई प्रतिनिधी उदय कासारे
मुंबई महानगरपालिकेकडून नालेसफाईची मोठी कामे पूर्ण झाल्याचा दावा केला जात असतानाच घाटकोपर पूर्व येथील लक्ष्मीनगर नाल्याची गंभीर अवस्था समोर आली आहे. नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
घाटकोपर पूर्वेकडील लक्ष्मीनगर नाल्यातील परिस्थिती अत्यंत खराब असून पालिका प्रशासनाचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी तफावत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या सूचनेनुसार आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालिका प्रशासन आणि महापौरांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनात उपविभागप्रमुख अजित गुजर, विधानसभा कार्यालयप्रमुख प्रकाश वाणी, संघटक प्रसाद कामतेकर, विजय चपटे, शाखाप्रमुख विशाल चावक, मयुरेश नामदास, महेश जंगम, शिक्षकेतर सेनेचे राज्य सचिव सचिन भांगे तसेच महिला आघाडीच्या नीलम कदम, पूनम परब, रचना सावंत, वृषाली चावक यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
स्थानिकांनी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची तातडीने सफाई करण्याची मागणी केली असून अन्यथा पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

