घाटकोपरमधील पालिका शाळेतील मध्यान्ह भोजनाची वैद्यकीय अधीक्षकांकडून तपासणी

घाटकोपर येथील पालिका शाळेतील मध्यान्ह भोजनात काचेचे तुकडे आढळल्याच्या वृत्तानंतर मुंबई महानगरपालिकेच्या अन्नसुरक्षा विभागाने तातडीने तपासणी केली. भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या निकषांची पडताळणी करण्यात आली.

Aug 4, 2026 - 21:10
 0  21
घाटकोपरमधील पालिका शाळेतील मध्यान्ह भोजनाची वैद्यकीय अधीक्षकांकडून तपासणी
घाटकोपर पालिका शाळा, मध्यान्ह भोजन तपासणी, मुंबई महानगरपालिका, अन्नसुरक्षा विभाग, वैद्यकीय अधीक्षक रवींद्र हांगे,

प्रतिनिधी: संतोष पांडे

प्रतिनिधी : घाटकोपर येथील पालिका शाळेतील मध्यान्ह भोजनात काचेचे छोटे तुकडे आढळल्याच्या वृत्तानंतर मुंबई महानगरपालिकेच्या अन्नसुरक्षा विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत संबंधित शाळेत प्रत्यक्ष भेट देऊन मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता, अन्न तयार करण्याची प्रक्रिया, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या उपाययोजनांची सखोल तपासणी केली.

३० जुलै रोजी मध्यान्ह भोजनात काचेचे छोटे तुकडे आढळल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार भोजन दिले जात असल्याची खात्री करण्यासाठी अन्नसुरक्षा विभागाने तातडीने तपासणी मोहीम राबविली.

उपयुक्त संतोषकुमार धोंडे आणि सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधीक्षक रवींद्र हांगे आणि अन्नसुरक्षा निरीक्षक संदीप भरणकर यांनी घाटकोपर येथील पालिका शाळेला भेट दिली.

तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांना भोजन वाढण्यापूर्वी अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी शाळेतील शिक्षकांसमवेत स्वतः भोजनाची चव घेऊन त्याची गुणवत्ता तपासली. तसेच भोजनाचा दर्जा, चव आणि सुरक्षिततेबाबत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली.

स्वयंपाकघरातील स्वच्छता व अन्नसुरक्षेची बारकाईने पाहणी

अधिकाऱ्यांनी शाळेतील स्वयंपाकघराची सविस्तर पाहणी करून भोजन तयार करण्याची पद्धत, स्वच्छतेची स्थिती, अन्नपदार्थांची साठवणूक, वापरल्या जाणाऱ्या साहित्याची गुणवत्ता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात आहे का, याची बारकाईने तपासणी केली.

भोजन तयार करताना आवश्यक स्वच्छता पाळली जाते का, अन्नपदार्थ सुरक्षित पद्धतीने हाताळले जातात का आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाची गुणवत्ता निर्धारित निकषांनुसार आहे का, याचीही पडताळणी करण्यात आली.

विद्यार्थी आणि पालकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा तसेच मध्यान्ह भोजन सुरक्षित व दर्जेदार असल्याची खात्री मिळावी, या उद्देशाने ही तपासणी करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि सुरक्षित आहाराचे मार्गदर्शन

तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, पौष्टिक आहार, सुरक्षित अन्न आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

भोजन करण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे, स्वच्छ आणि सुरक्षित अन्नाचे महत्त्व ओळखणे तसेच आरोग्याची योग्य काळजी घेणे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या निकषांचे नियमित पालन व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणेकडून आवश्यक देखरेख ठेवण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.