महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला यांना सेवानिवृत्तीनिमित्त भावपूर्ण निरोप

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी ३३ वर्षांच्या प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर सेवानिवृत्ती स्वीकारली. नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित विशेष समारंभात त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यांच्या प्रशासकीय योगदानाचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

May 31, 2026 - 22:07
 0  6
महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला यांना सेवानिवृत्तीनिमित्त भावपूर्ण निरोप
आर विमला, महाराष्ट्र सदन, निवासी आयुक्त, सेवानिवृत्ती

नवी दिल्ली, दि. ३१ मे २०२६ : महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी ३३ वर्षांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय शासकीय सेवेनंतर आज सेवानिवृत्ती स्वीकारली. यानिमित्त नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित विशेष समारंभात त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमाला माजी मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे तसेच हरियाणा राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्या डॉ. सुमेधा कटारिया यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आर. विमला यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या प्रशासकीय सेवेत दिलेल्या योगदानाचा गौरव केला. लोकाभिमुख प्रशासन, कार्यक्षम नेतृत्व, समन्वयक भूमिका आणि उपक्रमशील कार्यपद्धतीमुळे त्यांनी महाराष्ट्र सदनाची प्रतिमा अधिक सक्षम आणि प्रभावी बनवल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

नवी दिल्लीत महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व करताना विविध प्रशासकीय, सांस्कृतिक आणि जनसंपर्क उपक्रमांच्या माध्यमातून राज्याची सकारात्मक प्रतिमा उंचावण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र सदनाने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविल्याची आठवण यावेळी उपस्थितांनी करून दिली.

समारंभात महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी आर. विमला यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.