सरसंघचालक मोहन भागवत शेगावात दाखल; संत गजानन महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत शेगाव येथे दाखल झाले असून त्यांनी संत गजानन महाराज मंदिरात जाऊन समाधीचे दर्शन घेतले. दोन दिवसांच्या दौऱ्यात शेगाव आणि खामगाव येथे विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.

Aug 10, 2026 - 17:43
Aug 22, 2026 - 18:38
 0  23
सरसंघचालक मोहन भागवत शेगावात दाखल; संत गजानन महाराजांच्या समाधीचे घेतले दर्शन
मोहन भागवत, सरसंघचालक मोहन भागवत, शेगाव, गजानन महाराज मंदिर,

बुलढाणा | प्रतिनिधी : महेंद्र मिश्रा 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे आज शेगाव येथे आगमन झाले. शेगाव येथील प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिरात जाऊन त्यांनी संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. दोन दिवसांच्या शेगाव-खामगाव दौऱ्यासाठी मोहन भागवत बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांनी संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. मंदिरात त्यांच्या आगमनावेळी संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली.

दोन दिवस शेगाव-खामगाव दौरा

मोहन भागवत हे आजपासून दोन दिवस शेगाव आणि खामगाव परिसरात आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात संघाच्या विविध कार्यक्रमांसह स्थानिक पातळीवरील नियोजित उपक्रमांमध्ये ते सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिराला भेट देत दर्शन घेतल्यानंतर मोहन भागवत हे खामगावकडे रवाना होणार आहेत.

मोहन भागवत यांच्या शेगाव आगमनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात आवश्यक नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या दौऱ्याकडे संघ स्वयंसेवक तसेच स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.