रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; पहिल्या आवर्तनासह इन्स्टाग्राम रील स्पर्धेचे आयोजन

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त २६ जुलै रोजी भव्य वाद्यपूजन सोहळा, पहिल्या आवर्तनाचा शुभारंभ आणि आकर्षक इन्स्टाग्राम रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Jul 27, 2026 - 08:27
 0  7
रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा; पहिल्या आवर्तनासह इन्स्टाग्राम रील स्पर्धेचे आयोजन
रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा;

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पुणे, दि. २६ जुलै : पारंपरिक वाद्यसंस्कृतीचा प्रचार-प्रसार आणि तरुण पिढीला सांस्कृतिक वारशाशी जोडण्याच्या उद्देशाने रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या दशकपूर्तीनिमित्त भव्य वाद्यपूजन सोहळा, पहिल्या आवर्तनाचा शुभारंभ तसेच आकर्षक इन्स्टाग्राम रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, २६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता न्यू मॉडर्न विद्यालय, बाजीराव रोड, पुणे येथे होणार आहे.

कार्यक्रमात प्रसिद्ध पारंपरिक वादक मिकल्या लाडक्या शिंदे (पखवाज ताफा वादक) यांचा सत्कार करण्यात येणार असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंजुळाताई नागपुरे उपस्थित राहणार असून, अपूर्व दत्तात्रेय खाडे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

यावेळी रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या सेवाभावी उपक्रमांची माहिती देण्यात येणार असून, पारंपरिक वाद्यांचे वाद्यपूजन तसेच विविध वाद्यांचे सादरीकरण करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद्यसंस्कृती जपण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.

दशकपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या इन्स्टाग्राम रील स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ₹५०१, द्वितीय ₹३०१ आणि तृतीय ₹२०१ तसेच आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर आवश्यक अटी पूर्ण करून पोस्ट करणे बंधनकारक आहे. स्पर्धेचा निकाल २८ जुलै २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

रुद्रांग वाद्यपथक ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष अमर लक्ष्मण भालेराव (तात्या) यांनी पुणे शहरातील सर्व वाद्यपथके, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, वादक आणि नागरिकांनी या सांस्कृतिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी संजय गायकवाड (मो. ९६०४७६४२२८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0