ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : एक्सपायरी डेट बदलून व्हिटॅमिन खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
ठाणे शहर गुन्हे शाखा युनिट-३, कल्याण यांनी एक्सपायरी डेट संपलेल्या व्हिटॅमिन व खाद्यपदार्थांवर बनावट लेबल लावून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 26.63 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ठाणे शहर गुन्हे शाखा युनिट-३, कल्याण यांनी एक्सपायरी डेट संपलेल्या व्हिटॅमिन व खाद्यपदार्थांवर बनावट लेबल लावून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 26 लाख 63 हजार 509 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, काही जण एक्सपायरी डेट संपलेल्या खाद्यपदार्थांवर नवीन बनावट एक्सपायरी डेटचे लेबल लावून बाजारात विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 14 मे 2026 रोजी कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ परिसरातील “हिना मिनी बाजार” येथे छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी अब्दुलकरीम रईस खान (वय 40) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बिरबल रामदुलार यादव (वय 43) याच्याकडून एक्सपायरी डेट संपलेला माल आणून दुकानात विक्रीसाठी ठेवल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी भिवंडी येथील गोदामावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सप्लिमेंट्स, गमीज, न्यूट्रिशन प्रॉडक्ट्स, पीनट बटर, मल्टी मिलेट पास्ता, चॉकलेट स्प्रेड, फेस सिरम, हेअर गमीज आणि इतर खाद्यपदार्थ जप्त केले.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-३, कल्याण यांच्या पथकाने केली.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1

