अमर महाल ते तुर्भे जलबोगदा कार्यान्वित करण्यासाठी १८ मे रोजी काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अमर महाल (हेडगेवार उद्यान) ते तुर्भे निम्नस्तरीय जलाशय जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे १८ मे रोजी एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांत १२ तास पाणीपुरवठा विस्कळीत व कमी दाबाने होणार असून नागरिकांना पाणी उकळून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अमर महाल (हेडगेवार उद्यान) ते तुर्भे निम्नस्तरीय जलाशय जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे सोमवार, १८ मे २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० या १२ तासांच्या कालावधीत एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत आणि कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, एम पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक १४६, १४७ आणि १४८ तसेच एम पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक १५४ आणि १५५ मधील नागरिकांनी १८ मे ते २५ मे २०२६ या सात दिवसांच्या कालावधीत खबरदारीचा उपाय म्हणून पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
एम पूर्व विभागातील एचपीसीएल रिफायनरी, बीपीसीएल वसाहत, टाटा वसाहत, नित्यानंद बाग, आरसीएफ वसाहत, भारत नगर, हशू अडवाणी नगर, आणिक गाव, सह्याद्रीनगर, आरएनए उद्यान, म्हाडा इमारती, विष्णू नगर, प्रयागनगर, ओम गणेश नगर, राहुल नगर आणि अशोक नगर परिसरात पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.
तर एम पश्चिम विभागातील चेंबूर कॅम्प, सिंधी कॅम्प, विजय विहार, सुमन नगर, भक्ती भवन, बसंत पार्क, गांधी बाजार, इंदिरा नगर, रामटेकडी, चेंबूर वसाहत, गणेश नगर, अशोक नगर, सिंधी सोसायटी, माहूल गाव, वाशी नाका, जिजामाता नगर, रमाबाई वसाहत, महात्मा फुले नगर, अजंठा वसाहत, मुकुंद नगर, पंजाबी चाळ आणि छेडा नगरसह विविध भागांत पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.
महापालिकेने नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले असून काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
What's Your Reaction?
Like
6
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

