लोकभवन येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दिली राष्ट्रध्वजाला मानवंदना
मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले.
मुंबई, दि. १ मे : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील लोकभवन येथे आज उत्साहपूर्ण वातावरणात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर करण्यात आले. राज्यपालांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाई वाटप करून आनंद साजरा केला.
या कार्यक्रमास राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसेच मुंबई पोलीस दलाचे अधिकारी आणि जवान उपस्थित होते.
महाराष्ट्र दिनानिमित्त लोकभवन परिसरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
