महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजवंदन
महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.
मुंबई, दि. १ मे : महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले तसेच राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते. महाराष्ट्र दिनानिमित्त परिसरात उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0