पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ३५ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त; सेवाभिमुख कार्याचा गौरव

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जुलै २०२६ अखेर नियत वयोमानानुसार २१ आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेले १४ अशा एकूण ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Aug 1, 2026 - 23:26
 0  7
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ३५ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त; सेवाभिमुख कार्याचा गौरव
पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PCMC, अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त, जुलै २०२६ सेवानिवृत्ती,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. ३१ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून जुलै २०२६ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे २१ अधिकारी-कर्मचारी तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले १४ अधिकारी-कर्मचारी अशा एकूण ३५ जणांचा मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये अनेक वर्षे कार्यरत राहून नागरिकांना सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुरगुडे, नंदकुमार इंदलकर, मुख्य लिपिक माया वाकडे, महानगरपालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

जुलै २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये लेखाधिकारी प्रकाश ज्ञानोबा जाधव, कार्यालय अधीक्षक दौलत मदगे, सहाय्यक उद्यान निरीक्षक सुरेश कोळेकर, संगणक परिचालक सुरेखा झेंडे आणि ज्ञानेश्वर शेडगे, मुख्याध्यापक सविता जाधव व जयश्री गळीतकर, उपशिक्षिका संगीता रोकडे, उज्ज्वला तापकीर आणि शिला सोनवणे, सर्व्हेअर मुकुंद क्षिरसागर, सुरक्षा सुपरवायझर भारत भले, रखवालदार राजेंद्र रायकर, ईश्वर बहोत आणि चंद्रकांत राऊळ, मजूर दत्तात्रय काळभोर, दत्तात्रय टोपे, दिलीप गव्हाणे आणि शंकर धुमाळ तसेच सफाई सेवक अशोक कांबळे आणि ज्योतीराम खैरमोडे यांचा समावेश आहे.

स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुण सुपे, कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे, मनोहर जावरानी, वायरलेस ऑपरेटर श्रीकृष्ण बाबर, दूरध्वनी चालक जालिंदर साखरे, मुकादम राकेश गायकवाड, वंदना ओव्हाळ आणि शालन करडे, सफाई कामगार राजू शिंदे, बापू गायकवाड, अनिता रेड्डी आणि नमिना चव्हाण तसेच सफाई सेवक राणू गायकवाड आणि भारत गायकवाड यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले, तर मुख्य लिपिक माया वाकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.