शिवसेना सेनगाव तालुका आढावा बैठक उत्साहात संपन्न; ‘गाव तिथे शाखा’ उपक्रमावर भर
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे शिवसेनेची तालुका आढावा बैठक उत्साहात पार पडली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ‘गाव तिथे शाखा’ उपक्रमावर भर देत पुढील रणनीती निश्चित करण्यात आली.
हिंगोली प्रतिनिधी : भगवान मस्के
सेनगाव : शिवसेना उपनेते तथा हिंगोली लोकसभा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा आमदार संतोषराव बांगर आणि युवा सेना जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सेनगाव तालुक्याची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
ही बैठक सेनगाव येथील हॉटेल सुरची येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीत तालुक्यातील सर्कलनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला.
‘गाव तिथे शाखा’ उपक्रमावर विशेष भर
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ‘गाव तिथे शाखा’ या उपक्रमावर विशेष भर देण्यात आला. तसेच विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा करून आगामी काळातील पक्षाची रणनीती ठरविण्यात आली.
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
यावेळी आनंदराव जाधव आणि आमदार संतोष बांगर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. पक्ष बळकटीसाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजेंद्र शिखरे, माजी सभापती फकिरा मुंडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते, राजू नागरे, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी यांच्यासह आजी-माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, सेनगाव शहर व तालुक्यातील पदाधिकारी, सर्कल प्रमुख, गण प्रमुख, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1