'स्पिक मॅके'च्या शिष्टमंडळाची राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट; सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण

भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या 'स्पिक मॅके' संस्थेच्या शिष्टमंडळाने मुंबईतील लोकभवन येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देणारी पुस्तिका भेट देत आयआयटी दिल्ली येथे होणाऱ्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले.

Jul 16, 2026 - 23:24
 0  7
'स्पिक मॅके'च्या शिष्टमंडळाची राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट; सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रण
स्पिक मॅके, SPIC MACAY, राज्यपाल जिष्णु देव वर्मा, लोकभवन, भारतीय शास्त्रीय संगीत,

मुंबई, दि. १६ : भारतीय शास्त्रीय संगीत आणि संस्कृतीचा युवकांमध्ये प्रसार करणाऱ्या 'सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक अँड कल्चर अमंग युथ (SPIC MACAY)' या संस्थेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबईतील लोकभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने भारतीय शास्त्रीय संगीत, कला आणि संस्कृतीच्या जतन व प्रसारासाठी 'स्पिक मॅके'तर्फे देशभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती राज्यपालांना दिली. तसेच संस्थेच्या कार्याचा आढावा देणारी 'संदेश' ही पुस्तिका राज्यपालांना भेट देण्यात आली.

यावेळी शिष्टमंडळाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या 'स्पिक मॅके'च्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचे निमंत्रणही राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना दिले.

या प्रसंगी कल्पेन शुक्ला, नेहा बंद्योपाध्याय, गीता प्रकाश, सब्यसाची डे आणि सिम्पी सिंह हे शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते.

'स्पिक मॅके' ही संस्था युवकांमध्ये भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, लोककला आणि सांस्कृतिक परंपरांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असून, देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये नियमित कार्यक्रमांचे आयोजन करत असते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0