माण-हिंजवडी येथे ‘टी-२० प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

माण-हिंजवडी येथील फोर स्टार क्रीडांगणावर पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या ‘टी-२० प्रीमियर लीग’ स्पर्धेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पहिल्या सामन्यात बन्ट्स वॉरियरचा दमदार विजय.

Apr 7, 2026 - 18:52
 0  3
माण-हिंजवडी येथे ‘टी-२० प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
माण-हिंजवडी येथे ‘टी-२० प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

पुणे प्रतिनिधी - रोहन

पिंपरी, ता. ६ : पिंपरी-चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘टी-२० प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माण-हिंजवडी येथील फोर स्टार क्रीडांगणावर अत्यंत उत्साहात पार पडले. मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि क्रीडाप्रेमी श्रीरंग अप्पा बारणे यांच्या हस्ते सोमवारी (ता. ६) या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी खासदार बारणे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. स्पर्धेत बन्ट्स वॉरियर, प्रतीक रॉयल्स, स्पोर्ट स्टोरीज एव्हेंजर्स, सोनिगरा सुपर किंग्स, विश्व टायगर्स, सह्याद्री किंग्स, आसवानी डेअरडेव्हिल्स आणि मोरे पाटील पॅकर्स हे संघ सहभागी झाले आहेत.

उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार बारणे म्हणाले की, “टी-२० प्रीमियर लीगसारख्या स्पर्धा शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. स्पर्धा केवळ जिंकण्यासाठी नसून स्वतःचे कौशल्य दाखवण्यासाठी असते.” त्यांनी हिंजवडी परिसरातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामुळे झालेल्या विकासाचाही उल्लेख केला.

असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांनी सांगितले की, “या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून खेळाडूंनी उपलब्ध सुविधा आणि उत्तम मैदानाचा लाभ घ्यावा.” त्यांनी खेळाडूंना शिस्त राखण्याचे आणि पंचांच्या निर्णयाचा सन्मान करण्याचे आवाहन केले.

सदस्य प्रदीप वाघ यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना खासदार बारणे यांच्या क्रीडाप्रेमाचा उल्लेख केला. सचिव राजू कोतवाल यांनी खेळामुळे मैत्री आणि शिस्त यांसारख्या गुणांची जोपासना होत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाला खजिनदार संजय शिंदे, सहसचिव डॉ. दिलीपसिंह मोहिते, नरेंद्र कदम, मुकेश गुजराथी, अरुण जागडे, आनंद नायडू, विजय कोतवाल, प्रशांत तेलंगे, सुशील जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर कोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिलीपसिंह मोहिते यांनी केले.

🏏 पहिला सामना

उद्घाटनानंतर झालेल्या पहिल्या सामन्यात प्रतीक रॉयल्स संघाने १६.५ षटकांत १०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात बन्ट्स वॉरियरने ११ षटकांत बिनबाद १०८ धावा करत १० गडी राखून विजय मिळवला. गणेश कलेल यांना उत्कृष्ट फलंदाजीबद्दल सामनावीर घोषित करण्यात आले.

उद्घाटनाच्या सामन्यात बन्ट्स वॉरियरने पहिला विजय मिळवत स्पर्धेची दमदार सुरुवात केली. 🏆

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0