‘रंगकर्मी क्रिकेट लीग २०२६’मध्ये ‘स्टार मराठा’ संघ विजेता

मंगेश सांगळे फाउंडेशन आयोजित ‘रंगकर्मी क्रिकेट लीग २०२६’ स्पर्धेत हरीश दुधाडे यांच्या नेतृत्वाखालील ‘स्टार मराठा’ संघाने विजेतेपद पटकावले. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार आणि रंगकर्मींच्या सहभागामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली.

May 18, 2026 - 19:28
 0  4
‘रंगकर्मी क्रिकेट लीग २०२६’मध्ये ‘स्टार मराठा’ संघ विजेता
रंगकर्मी क्रिकेट लीग 2026, स्टार मराठा विजेता,

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

मुंबई :

मंगेश सांगळे फाउंडेशन प्रस्तुत ‘रंगकर्मी क्रिकेट लीग २०२६’ ही स्पर्धा १४ आणि १५ मे रोजी परळ येथील सेंट्रल रेल्वे ग्राऊंडवर मोठ्या उत्साहात पार पडली. मराठी मनोरंजन विश्वातील कलाकार, तंत्रज्ञ आणि रंगकर्मी यांच्या सहभागामुळे या स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली.

दोन दिवस रंगलेल्या या क्रिकेट स्पर्धेत चौकार-षटकारांची आतषबाजी, रोमांचक सामने आणि खेळाडूंचा उत्साह प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी स्पर्धेला विशेष उपस्थिती लावत खेळाडूंचा उत्साह वाढवला.

या स्पर्धेत हरीश दुधाडे यांच्या नेतृत्वाखालील ‘स्टार मराठा’ संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन करत त्यांनी प्रतिस्पर्धी संघावर मात केली. तर संचित यादव यांच्या नेतृत्वाखालील ‘वीर मराठा’ संघ उपविजेता ठरला.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी दाखवलेली संघभावना, मैत्री आणि क्रीडाभाव यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. ‘रंगकर्मी क्रिकेट लीग’मुळे रंगकर्मींच्या नात्यांना नवी ऊर्जा मिळाल्याची भावना सहभागी कलाकारांनी व्यक्त केली.

या लीगमध्ये एकूण सहा संघ सहभागी झाले होते. अभिनेता विजय पाटकर यांच्या नेतृत्वाखाली ‘मराठा रायझिंग’ संघ मैदानात उतरला होता. तसेच संचित यादव यांच्या नेतृत्वाखाली ‘वीर मराठा’, नुपूर दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘मर्द मराठा’, हरीश दुधाडे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार मराठा’, कांचन पगारे यांच्या नेतृत्वाखाली ‘मराठा शिलेदार’ आणि सागर कारंडे यांच्या नेतृत्वाखाली ‘मराठा वॉरियर’ संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0