आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट; विभागीय आढावा बैठकीत आरोग्य सेवांचा आढावा

आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली. यानंतर विभागीय आढावा बैठकीत विविध आरोग्य योजनांचा आढावा घेण्यात आला.

Jul 25, 2026 - 23:22
 0  7
आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट; विभागीय आढावा बैठकीत आरोग्य सेवांचा आढावा
आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांची गारगोटी उपजिल्हा रुग्णालयास भेट;

कोल्हापूर प्रतिनिधी :  उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. २५ : मुंबई आरोग्य सेवा तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त संजय काटकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील आरोग्य सेवा, स्वच्छता, रुग्णाभिमुख सुविधा आणि सेवा वितरणाच्या गुणवत्तेचा आढावा घेत रुग्णालयाच्या समाधानकारक कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

भेटीदरम्यान आयुक्त काटकर यांनी आशा स्वयंसेविकांशी संवाद साधत त्यांच्या कामातील अनुभव, अडचणी आणि सूचना जाणून घेतल्या. आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आशा स्वयंसेविकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शेंडा पार्क येथील प्रस्तावित जागेचीही पाहणी करण्यात आली.

यानंतर आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या प्रारंभी उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी विभागातील आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांची सद्यस्थिती, उपलब्धी, आव्हाने आणि आगामी नियोजनाचा सविस्तर आढावा सादर केला.

बैठकीत कोल्हापूर विभागातील आरोग्य सेवांची गुणवत्ता, विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सेवा वितरणातील सुधारणा आणि भविष्यातील नियोजनावर सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीस कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांतील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी, हिवताप अधिकारी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0