विवाह चषक 2026: लालबागचा राजा क्रिकेट संघ विजेता

मुंबईत आयोजित विवाह चषक 2026 क्रिकेट स्पर्धेत लालबागचा राजा क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले; 16 संघांचा सहभाग.

Apr 4, 2026 - 02:19
Apr 5, 2026 - 03:26
 0  5
विवाह चषक 2026: लालबागचा राजा क्रिकेट संघ विजेता
Lalabuag Cricket Team

मुंबईत ‘विवाह चषक 2026’ या क्रिकेट स्पर्धेत लालबागचा राजा क्रिकेट टीम ने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांच्या विवाह दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आली होती.

दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाच्या वतीने, दीपक तांबे

यांच्या नेतृत्वाखाली ‘भीम नगर प्रीमियर लीग – विवाह चषक’ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबईतील एकूण 16 क्रिकेट संघांनी उत्साहाने सहभाग घेतला.

अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात लालबागचा राजा क्रिकेट टीम ने उत्कृष्ट खेळ करत विजय मिळवला. विजेत्या संघाला प्रथम क्रमांकाचा चषक, रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेचे मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. त्यांच्या परिश्रमामुळे हा क्रीडा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0