वारकरी संप्रदायाच्या उमरखेड तालुका महिला अध्यक्षपदी ह.भ.प. पुष्पा दीदी महाराज शेवकर यांची नियुक्ती

वारकरी संप्रदाय नाशिक मंडळाच्या वतीने ह.भ.प. पुष्पा दीदी महाराज शेवकर यांची उमरखेड तालुका महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. आण्णासाहेब आहेर हिसवळकर यांनी ही घोषणा केली.

Jul 18, 2026 - 20:31
 0  67
वारकरी संप्रदायाच्या उमरखेड तालुका महिला अध्यक्षपदी ह.भ.प. पुष्पा दीदी महाराज शेवकर यांची नियुक्ती
वारकरी संप्रदाय, पुष्पा दीदी महाराज शेवकर, उमरखेड, यवतमाळ,

यवतमाळ | प्रतिनिधी : रवी वाघमारे 

संत तुकाराम महाराजांच्या "हेचि आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम" या वचनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रात आध्यात्मिक चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने वारकरी संप्रदाय नाशिक मंडळाने संघटन विस्ताराचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार ह.भ.प. पुष्पा दीदी महाराज शेवकर यांची उमरखेड तालुका महिला अध्यक्ष म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती वारकरी संप्रदाय नाशिक मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ह.भ.प. आण्णासाहेब आहेर हिसवळकर यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली. नियुक्तीपत्र प्रदान करताना यवतमाळ जिल्हाध्यक्ष ह.भ.प. विनायकराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

ह.भ.प. पुष्पा दीदी महाराज शेवकर यांनी वारकरी संप्रदायाच्या उद्दिष्टांवर विश्वास व्यक्त करत मंडळाची रचना, कार्यपद्धती आणि नियमावलीचे पालन करून समाजात आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य करण्याची तयारी दर्शविली होती. त्यांच्या निष्ठा, समर्पण आणि सेवाभावी कार्याची दखल घेत त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ही नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी अथवा राष्ट्रीय अध्यक्षांच्या पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. या नियुक्तीमुळे उमरखेड तालुका आणि यवतमाळ जिल्ह्यातील वारकरी महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, संप्रदायाच्या कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यावेळी वारकरी संप्रदायाच्या पदाधिकाऱ्यांनी ह.भ.प. पुष्पा दीदी महाराज शेवकर यांना पुढील सामाजिक व आध्यात्मिक कार्यासाठी शुभेच्छा देत, विठ्ठल चरणी त्यांच्या यशस्वी कार्यासाठी प्रार्थना केली.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1