केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची माथा येथील रामदास आठवले विद्यालयाला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील माथा येथील रामदास आठवले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित केले.
हिंगोली | प्रतिनिधी : भगवानराव मस्के
केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील बहुजन समाज जागृती सेवाभावी संस्था, परभणी संचलित रामदास आठवले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, माथा येथे दि. १६ जुलै रोजी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या भेटीमुळे विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
भेटीदरम्यान मंत्री रामदास आठवले यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि भविष्यातील ध्येयांविषयी जाणून घेत विद्यार्थ्यांना मनापासून मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे आणि समाजाचे भविष्य घडविण्याचे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश दिला.
यावेळी त्यांनी विद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता, विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेतली. संस्थेच्या कार्याचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष त्र्यंबकराव कुटे, प्राचार्य रामदास वाबळे, सुनील कुटे, संजय कुटे, विश्वनाथ रोडगे, विजय काळासरे, गजानन जाधव, अंकुश माटे, विजय कालवे, व्यंकटी हिवराळे, भगवान मस्के, प्रशांत बोराडे, विशाल काळे, ईश्वर आंधळे, रावसाहेब घरजाळे, सौ. सुरेखा घुगे, सौ. शारदा पोटे, नंदकुमार आघाव, मल्लिकार्जून स्वामी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0