महागावात काँग्रेसचे बीएलए प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; संघटन बळकटीवर भर

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे काँग्रेसच्या बूथ लेव्हल एजंट (बीएलए) प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शिबिरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथस्तरावरील संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

Jul 13, 2026 - 16:06
 0  3
महागावात काँग्रेसचे बीएलए प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न; संघटन बळकटीवर भर
महागाव, यवतमाळ, काँग्रेस, बीएलए प्रशिक्षण, सचिन नाईक, बूथ लेव्हल एजंट, प्रताप परभणीकर, काँग्रेस कार्यकर्ते,

यवतमाळ | प्रतिनिधी: रवी वाघमारे 

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने महागाव येथील प्रियदर्शनी कॉन्व्हेंट येथे रविवारी (१२ जुलै) काँग्रेसच्या बूथ लेव्हल एजंट (बीएलए) प्रशिक्षण शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. शिबिरात बूथस्तरावर पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांना विविध संघटनात्मक आणि तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षण शिबिराला यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाची खरी ताकद ही बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे सांगितले. प्रत्येक बीएलएने जबाबदारीने आणि सजगतेने काम करून प्रत्येक मतदारापर्यंत पक्षाची भूमिका पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात एसआयआर प्रशिक्षक प्रतापजी परभणीकर यांनी निवडणूक प्रक्रिया, बूथ व्यवस्थापन तसेच संघटनात्मक कामकाजाविषयी सविस्तर प्रशिक्षण दिले. आगामी निवडणुकांमध्ये प्रभावी नियोजनासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी सुनील राठोड, महेंद्र कावळे, स्वप्निल नाईक, जावेद चव्हाण, नवाब जानी, इम्रान पठाण, सुनील भवानकर आणि अमोल मोहकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महागाव तालुक्यातील सर्व बूथवरील नियुक्त बीएलए, प्रमुख नेते, पदाधिकारी आणि निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आगामी काळात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून पक्षाची ध्येयधोरणे प्रभावीपणे मांडण्याचा आणि संघटन अधिक सक्षम करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1