ठाण्यातील शासकीय गोचर जमिनीची मोजणी करून अहवाल सादर करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे
ठाणे येथील कोलशेत परिसरातील शासकीय गोचर जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणात तातडीने कारवाई करत जमिनीची मोजणी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित प्रशासनाला दिले.
दि. २२ : ठाणे जिल्ह्यातील कोलशेत परिसरातील शासकीय गोचर जमिनीवरील अतिक्रमणाच्या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले आहेत. संबंधित जमिनीची प्रत्यक्ष मोजणी करून सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
या संदर्भात अजितनाथ राम पाटील यांनी निवेदन सादर केले होते. त्यानुसार विधानभवन येथे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला महसूल विभाग, ठाणे महानगरपालिका, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच ठाणे जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत उपाध्यक्ष बनसोडे यांनी संबंधित प्रकरणात कायदेशीर निर्णय घेण्यासाठी जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. तसेच या प्रकरणाशी संबंधित सर्व विभागांनी सखोल चौकशी करून जमिनीची अचूक मोजणी, कागदपत्रांची पडताळणी आणि सर्व तपशीलांसह अहवाल तातडीने सादर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासकीय गोचर जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर असून, यावर वेळेत आणि प्रभावी कारवाई होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0