विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुविधा उपलब्ध करण्यावर भर – सभापती रविना आंगोळकर

पिंपरी चिंचवड दीक्षांत समारंभ, PCMC शाळा, विद्यार्थी विकास, रविना आंगोळकर, शिक्षण विभाग, बालवाडी ते पहिली

Apr 14, 2026 - 01:01
 0  0
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुविधा उपलब्ध करण्यावर भर – सभापती रविना आंगोळकर
रविना आंगोळकर, शिक्षण विभाग,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. १३ एप्रिल २०२६: बालवाडी हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून, या टप्प्यावर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सृजनशीलता आणि शिकण्याची आवड निर्माण करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन शिक्षण समितीच्या सभापती रविना आंगोळकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे पीसीएमसी पब्लिक स्कूल, साई जीवन, जाधववाडी (कन्या व मुले शाळा क्र. ८७) येथे बालवाडीतून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास विधी समिती सभापती सुजाता बोराटे, नगरसदस्य राहुल जाधव, प्रशासन अधिकारी संगिता बांगर, मुख्याध्यापक जयश्री गळीतकर, मुख्याध्यापिका मृगनयनी चव्हाण, पर्यवेक्षक प्रमिला जाधव तसेच शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभापती रविना आंगोळकर यांनी सांगितले की, दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असून, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे. पालक, शिक्षक आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यार्थ्यांचा उज्ज्वल भविष्यकाळ घडविणे शक्य आहे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्ती जपत सातत्याने प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी इतर मान्यवरांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धमेंद्र भांगे यांनी केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0