महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोल्हापुरातील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात दर्शन घेत राज्यातील नागरिकांचे सुख-समृद्धी, चांगला पाऊस, पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.

Aug 23, 2026 - 19:14
 0  7
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतले श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन
चंद्रशेखर बावनकुळे, महालक्ष्मी अंबाबाई, कोल्हापूर, महसूल मंत्री, अंबाबाई मंदिर,

प्रतिनिधी: उमेश जाधव 

कोल्हापूर, दि. २३ (जिमाका) : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांचे सुख-समृद्धी, चांगला पाऊस आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रार्थना केली.

दर्शनानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मंत्री बावनकुळे म्हणाले की, राज्यातील सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि समाधान लाभावे, राज्यात चांगला पाऊस पडावा, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे तसेच राज्यातील शेतकरी समृद्ध व्हावा, यासाठी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना केली.

भाविकांशी साधला संवाद

दर्शनानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी मंदिर परिसराची पाहणी केली तसेच उपस्थित भाविकांशी संवाद साधला. यावेळी मंदिरातील व्यवस्थेबाबतही त्यांनी माहिती घेतली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे-परीट, महादेव दिंडे, महेश जाधव, विजय जाधव, नाथाजी पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे यांच्या अंबाबाई दर्शनावेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती होती. त्यांनी भाविकांशी संवाद साधत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.