घाटकोपर पश्चिम भटवाडी खंडोबा मंदिराचे नूतनीकरण; महापौर रितू तावडे आणि आमदार राम कदम यांच्या हस्ते उद्घाटन
घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी खंडोबा मंदिराच्या नूतनीकरणाचे उद्घाटन मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि आमदार राम कदम यांच्या हस्ते पार पडले. यावेळी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई प्रतिनिधी उदय कासारे
मुंबई :
घाटकोपर पश्चिम येथील भटवाडी खंडोबा मंदिराच्या नूतनीकरणाचे उद्घाटन आज मुंबईच्या महापौर सौ. रितू तावडे आणि आमदार राम कदम यांच्या हस्ते करण्यात आले. धार्मिक वातावरणात आणि उत्साहपूर्ण माहोलात हा कार्यक्रम पार पडला.
मंदिराच्या नूतनीकरणामुळे परिसरातील भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून मंदिर परिसराला नव्या स्वरूपात सजविण्यात आले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मंदिराच्या जतन आणि संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
कार्यक्रमाला घाटकोपर पश्चिम परिसरातील चंद्रकांत मालकर, सुरेश पाटील आणि विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी खंडोबा मंदिराच्या नूतनीकरणाबद्दल समाधान व्यक्त करत आनंद साजरा केला.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
2
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1

