महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती

महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत तेलंगणाच्या लोककला, लोकनृत्य आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविण्यात आले.

महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती
तेलंगणा राज्य स्थापना दिन, महाराष्ट्र लोकभवन, जिष्णु देव वर्मा

महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्य स्थापना दिन उत्साहात साजरा; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई, दि. ४ : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख

उपस्थितीत महाराष्ट्र लोकभवन येथे तेलंगणा राज्याचा स्थापना दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.

'वर्मा फाउंडेशन' आणि फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तेलंगणा राज्याची लोकगीते, लोकनृत्ये आणि पारंपरिक सांस्कृतिक वारशाचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. यावेळी 'जय जय हे तेलंगणा', 'आंदे श्री' आणि 'वंदे शिवम शंकरम' यांसारखी लोकप्रिय तेलंगणा गीतेही सादर करण्यात आली. तसेच शिव प्रताप शुक्ला यांचा व्हिडिओ संदेश उपस्थितांना दाखविण्यात आला.

कार्यक्रमात कलाकारांनी 'बथुकम्मा', 'बोनालू' आणि इतर पारंपरिक नृत्यप्रकार सादर करून तेलंगणाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. नाट्य शिरोमणी शेख नादिया यांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. त्यांच्या अभिनय आणि कलात्मकतेचे राज्यपालांनी विशेष कौतुक केले.

यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भारतातील विविध राज्यांची भाषा, वेशभूषा, नृत्यकला आणि खाद्यसंस्कृती वेगवेगळी असली तरी संपूर्ण देश एका सांस्कृतिक धाग्याने जोडलेला असल्याचे सांगितले. 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रमामुळे विविध राज्यांच्या संस्कृतींची ओळख आणि परस्पर समन्वय वाढण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

'विकसित भारत' ही संकल्पना केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित नसून ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या मूल्यांवर आधारित असल्याचे सांगत शासन आणि समाजाने एकत्रितपणे कार्य केल्यास विकसित भारताचे स्वप्न निश्चितपणे साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला निवृत्त न्यायमूर्ती मदन गोसावी, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा, वर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष पी. यू. एन. वर्मा, 'मराठी-तेलगू मंच'चे संस्थापक आणि फेडरेशन ऑफ तेलगू असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष जगन बाबू गंजी यांच्यासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.