सौर कृषीपंप तक्रार निवारणासाठी महावितरणचा पुढाकार; शेतकऱ्यांसाठी विशेष मेळावे आयोजित

सौर कृषीपंप तक्रार, महावितरण मेळावा, बुलढाणा शेतकरी, कृषीपंप समस्या, वीज सेवा महाराष्ट्र, शेतकरी सहाय्यता

Apr 13, 2026 - 22:17
 0  5
सौर कृषीपंप तक्रार निवारणासाठी महावितरणचा पुढाकार; शेतकऱ्यांसाठी विशेष मेळावे आयोजित
बुलढाणा, महावितरण, सौर कृषीपंप, शेतकरी, तक्रार निवारण, मेळावा, महाराष्ट्र

बुलढाणा (प्रतिनिधी): - अमोल सराफ 

सौर कृषीपंपांबाबत शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महावितरण, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने विशेष तक्रार निवारण मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.

अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी शेतकऱ्यांना आवाहन करत सांगितले की, उपविभागनिहाय होणाऱ्या या मेळाव्याचा लाभ सर्व संबंधित शेतकऱ्यांनी घ्यावा. वीज सेवा अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने महावितरण सतत प्रयत्नशील असून, सौर कृषीपंपांशी संबंधित समस्या त्वरित सोडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या मेळाव्यात महावितरणचे अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच सौर कृषीपंप बसविणाऱ्या एजन्सींचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारींचे जागेवरच प्रभावी निराकरण होण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी हे मेळावे त्यांच्या परिसरातच आयोजित करण्यात आले असून, संबंधित उपविभागीय कार्यालयात सकाळी ११ वाजता मेळाव्याला सुरुवात होईल.

मेळाव्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

१६ एप्रिल : बुलढाणा, देऊळगाव राजा

१७ एप्रिल : चिखली, उदयनगर, संग्रामपूर

२० एप्रिल : नांदुरा, खामगाव, धाड, खामगाव ग्रामीण-१ व २, सिंदखेड राजा

२१ एप्रिल : खामगाव शहर, शेगाव, लोणार, मेहकर

२२ एप्रिल : जळगाव जामोद, मोताळा, मलकापूर

महावितरणने सर्व संबंधित शेतकऱ्यांनी या मेळाव्याला उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात व त्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0