समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ तिहेरी अपघात; २ गंभीर, ५ जखमी

समृद्धी महामार्ग अपघात, मेहकर अपघात बातमी, बुलढाणा न्यूज, तिहेरी अपघात, महाराष्ट्र रस्ता अपघात, जखमी प्रवासी

Apr 11, 2026 - 16:24
 0  3
समृद्धी महामार्गावर मेहकरजवळ तिहेरी अपघात; २ गंभीर, ५ जखमी
Samruddhi Highway Accident,

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ समृद्धी महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी सुमारे चारच्या सुमारास तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असून पाच जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २९३ (मुंबई कॉरिडॉर) येथे हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर येथील शशांक कृष्णा खेरणार (वय २५) हे आपल्या नेक्सा कारने (MH 17 BV 0061) मुंबईच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या कारने समोरील एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली.

धडकेनंतर पुढील वाहनांमध्ये साखळी प्रतिक्रिया होऊन तिहेरी अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.

जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू असून संबंधित अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0