“भाजपमध्ये पक्ष संघटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही” – अॅड. भरतजी पाटील
पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या संघटनात्मक आढावा बैठकीत नवनियुक्त शहर प्रभारी अॅड. भरतजी पाटील यांनी पक्ष संघटना वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना पक्ष बळकटीकरणासाठी काम करण्याचे आवाहन केले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड : “राजकारणात काम करत असताना पक्ष संघटना ही नेहमी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा मोठी असते. भारतीय जनता पक्षात संघटनेपेक्षा श्रेष्ठ या जगात कोणीही नाही,” असे ठाम प्रतिपादन भाजपचे नवनियुक्त शहर प्रभारी अॅड. भरतजी पाटील यांनी केले.
मोरवाडी येथील भाजप शहर कार्यालयात आयोजित संघटनात्मक आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अॅड. भरतजी पाटील यांची प्रभारीपदी नियुक्ती केल्यानंतर आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
पक्ष बळकटीकरणावर भर
या बैठकीत शहरातील पक्ष संघटनेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अॅड. भरतजी पाटील यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले.
बैठकीला शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस अॅड. मोरेश्वर शेडगे, माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह विविध पदाधिकारी, मोर्चे, आघाड्या, सेल आणि मंडल अध्यक्ष उपस्थित होते.
“कार्यकर्त्यांचे कष्ट हीच खरी ताकद”
यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरात भाजपच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत घेतले आहे. शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवण्याबरोबरच सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे.
“कार्यकर्त्यांचे कष्ट आणि जनतेचा विश्वास हीच आपली खरी ताकद असून आगामी काळात पक्ष संघटना अधिक गतिमान करण्यावर भर दिला जाईल,” असेही त्यांनी नमूद केले.
निवडणूक तयारीला वेग
मोरवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या तयारीला वेग आल्याचे बोलले जात आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0