पश्चिम उपनगरांत नालेस्वच्छतेला वेग; ३१ मेपर्यंत १००% काम पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबईतील पश्चिम उपनगरांमध्ये नालेस्वच्छतेची कामे वेगात; अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी करत ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

Apr 15, 2026 - 22:30
 0  8
पश्चिम उपनगरांत नालेस्वच्छतेला वेग; ३१ मेपर्यंत १००% काम पूर्ण करण्याचे निर्देश
विपिन शर्मा, पावसाळा तयारी, बीएमसी,

मुंबई :

पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेकडून मोठ्या आणि लहान नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे सध्या वेगात सुरू आहेत. पश्चिम उपनगरांमधील या कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

एच पूर्व, एच पश्चिम, के उत्तर आणि के दक्षिण विभागांतील विविध नाल्यांची पाहणी करत त्यांनी कामांचा आढावा घेतला. मोगरा नाला, वाकोला नाला, कृष्णा नगर नाला, अंधेरी भूयारी मार्ग, एसएनडीटी नाला यांसह वांद्रे परिसरातील बाजार नाला, गरवारे नाला आणि अॅपेक्स नाला येथे त्यांनी भेट दिली.

यावेळी नाल्यांमधील गाळ आणि तरंगता कचरा तातडीने हटवण्याचे निर्देश देण्यात आले. “३१ मे २०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत नालेस्वच्छतेची कामे १०० टक्के पूर्ण करावीत,” असे स्पष्ट आदेश डॉ. शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून नालेस्वच्छतेच्या कामांची माहिती नियमितपणे देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेवक, सहाय्यक आयुक्त तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0