करवंड महोत्सवाची भव्य सुरुवात; १८ पगड जातींची ऐतिहासिक एकजूट
बुलढाण्यातील करवंड गावात ऐतिहासिक करवंड महोत्सव-२०२६ उत्साहात सुरू; आमदार श्वेता महाले यांच्या पुढाकाराने १८ पगड जाती एकत्र आल्या.
विदर्भ ब्यूरो| अमोल सराफ :
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करवंड गावात ऐतिहासिक करवंड महोत्सव-२०२६ ची आज भव्य सुरुवात झाली. छत्रपती शिवराय आणि महाराणी गुणवंताबाई यांच्या विवाहाला ३७० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
राजमाता जिजाबाईंचे माहेरघर आणि शिवरायांची सासर म्हणून ओळख असलेल्या करवंड गावात सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारोही पुतळ्याला अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर काढण्यात आलेल्या भव्य ऐतिहासिक शोभायात्रेत शिवकालीन प्रसंगांचे सजीव दर्शन घडले.
या महोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे गावातील १८ पगड जाती एकत्र येत एकजूट दाखवली. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून, “या महोत्सवामुळे सामाजिक एकात्मतेचा मजबूत संदेश समाजात जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक उपक्रमामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0