श्रीरामपूर मतदारसंघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीरामपूर मतदारसंघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देत नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावर भर दिला.

Apr 16, 2026 - 00:06
 0  1
श्रीरामपूर मतदारसंघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण करा – मंत्री गुलाबराव पाटील
मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, दि. १५ : श्रीरामपूर मतदारसंघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. या बैठकीस आमदार हेमंत ओगले, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, जल जीवन मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले की, जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांमधील अडचणी तातडीने दूर कराव्यात. आवश्यक परवानग्या आणि तांत्रिक बाबींची पूर्तता विलंब न करता करणे आवश्यक आहे.

ग्रामीण भागातील पाणीपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने सर्व विभागांनी समन्वय राखून कामे जलदगतीने पूर्ण करावीत. प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्यावर भर देत कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीत ठेकेदारांच्या अडचणी, तांत्रिक बाबी तसेच निधी वितरण यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0