पिंपरी चिंचवड महापालिकेतून ३० अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सन्मान
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून एप्रिल २०२६ अखेर ३० अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त झाले. उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय भवनात सन्मान सोहळा पार पडला.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून एप्रिल २०२६ अखेर नियत वयोमानानुसार तसेच स्वेच्छानिवृत्ती स्वीकारलेल्या ३० अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत मधुकर पवळे सभागृहात पार पडला. उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर यांनी सांगितले की, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यरत असताना प्रामाणिकपणा, निष्ठा आणि समर्पणाने सेवा बजावत महापालिकेच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यामुळे संस्थेची भक्कम पायाभरणी झाली असून महापालिका त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, सेवानिवृत्तीनंतरचा काळ हा नव्या संधींचा असतो. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समाजकार्यात सक्रिय सहभाग घेत आनंदी आणि समाधानकारक आयुष्य जगावे. तसेच कुटुंबीयांनीही त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी.
कार्यक्रमात सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी “सेवानिवृत्ती ही केवळ कागदावर असते, मनाची नसते” असे सांगत सेवानिवृत्तांनी आपली लोकसेवा, कर्तव्यनिष्ठा आणि अनुभव नव्या पिढीसाठी मार्गदर्शक म्हणून वापरावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास नगरसेवक कुशाग्र कदम, उत्तम केंदळे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
एप्रिल २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्यांमध्ये कार्यकारी अभियंता सुनील वाघमारे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र फिरके, मुख्याध्यापक जयमाला गावडे, चंदा काकडे, सिस्टर इन्चार्ज रोहिणी काकडे, मुख्य लिपिक प्रकाश बाणेकर, राजकुमार यादव, मुरगू बोटे, माया गिते, उपशिक्षक सुनिता इंगळे, फार्मासिस्ट मिलिंद पंडित, सांख्यिकी सहाय्यक प्रशांत उमराणी, वाहन चालक विलास ढोरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता राजेंद्र मोराणकर, स्टाफनर्स मंगल डफळ, मुकादम सुनील माने, प्रविण डोळस, सफाई कामगार शाम मासरे, कांता शितोळे, मच्छिंद्र सोनवणे, सफाई सेवक महंमद कादर, तुकाराम गोफणे, दीपक उबाळे यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0