शिवशाही व्यापारी संघ महिला आघाडी प्रदेश अध्यक्षपदी उषामाई कांबळे; उपाध्यक्षपदी महानंदाताई चव्हाण
शिवशाही व्यापारी संघाच्या महिला आघाडी प्रदेश अध्यक्षपदी उषामाई भिमराव कांबळे तर उपाध्यक्षपदी महानंदाताई सोपान चव्हाण यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. महिला सक्षमीकरण आणि व्यापारी महिलांच्या प्रश्नांवर भर देण्यात येणार आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी-चिंचवड, दि. १६ : राज्यव्यापी कार्यरत असलेल्या शिवशाही व्यापारी संघाच्या महिला आघाडी प्रदेश अध्यक्षपदी उषामाई भिमराव कांबळे तर उपाध्यक्षपदी (प्रभारी) महानंदाताई सोपान चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली.
या नियुक्तीबाबत माहिती देताना युवराज दाखले म्हणाले की, “उषामाई कांबळे आणि महानंदाताई चव्हाण या सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असून महिला सक्षमीकरण, व्यापारी महिलांचे प्रश्न आणि हिंदू संस्कृती रक्षणासाठी त्या प्रभावीपणे काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात, विशेषतः पिंपरी-चिंचवड शहरात महिला आघाडी अधिक मजबूत होईल आणि संघटनेचा विचार घराघरात पोहोचेल.”
नवनियुक्त महिला आघाडी प्रदेश अध्यक्षा उषामाई भिमराव कांबळे आणि उपाध्यक्षा महानंदाताई सोपान चव्हाण यांनी नियुक्तीबद्दल संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “युवराज दादांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि इतर बहुजन महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन महिला आघाडी अधिक सक्षम करण्यासाठी काम केले जाईल.”
महिला सुरक्षा, स्वसंरक्षण, स्वावलंबन आणि धर्मरक्षण या विषयांवर प्राधान्याने काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महिला आघाडीचे आगामी प्रमुख उपक्रम:
प्रत्येक जिल्हा व प्रभागात महिला संपर्क प्रमुखांची नियुक्ती
व्यापारी महिलांच्या समस्यांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करणे
लव्ह जिहाद जनजागृती अभियान राबविणे
महिलांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे
महिला बचत गट व उद्योजकतेला चालना देणे
“उषामाई आणि महानंदाताई यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड शहरात संघटनेला नवी ऊर्जा मिळाली असून लवकरच संपूर्ण महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल,” असे युवराज दाखले यांनी सांगितले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0