वीज व्यवस्थापनासाठी AI चा वापर करा : देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
उन्हाळ्यातील वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभूमीवर वीजनिर्मिती आणि पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबई, दि. १८ : उन्हाळ्यातील ‘पीक डिमांड’ लक्षात घेता राज्यातील वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊर्जा विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करावा, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ऊर्जा व्यवस्थापन, देखभाल व दुरुस्तीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला. बैठकीस ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच टाटा पॉवर, अदाणी पॉवर आणि ‘बेस्ट’चे प्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यात वीज निर्मितीसाठी आवश्यक कोळसा व पाण्याची उपलब्धता असल्याचे सांगण्यात आले. कोयना जलविद्युत प्रकल्पातून १८०० मेगावॅटपर्यंत वीज निर्मितीची क्षमता उपलब्ध असून आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त वीज खरेदीचीही तयारी करण्यात आली आहे.
मुंबई आयलँडिंग योजनेमुळे ग्रिड बिघाड झाल्यासही मुंबईत वीजपुरवठा सुरू ठेवण्याची क्षमता आहे. तसेच भिरा पंप्ड स्टोरेज प्रकल्प आणि SLDC बॅकअप प्रणालीमुळे आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास यंत्रणा सक्षम असल्याची माहिती देण्यात आली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0
