हिंगोलीत ६ महिन्यांपासून वेतन रखडल्याने वनमजूर महिलांचे उपोषण

हिंगोली वनविभागांतर्गत कार्यरत वनमजूर महिलांचे ६ महिन्यांपासून वेतन रखडल्याने त्यांनी ६ एप्रिलपासून भर उन्हात उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून अद्याप दखल न घेतल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

Apr 22, 2026 - 13:46
 0  139
हिंगोलीत ६ महिन्यांपासून वेतन रखडल्याने वनमजूर महिलांचे उपोषण
हिंगोली बातमी, वनमजूर महिला उपोषण, वेतन रखडले,

हिंगोली (प्रतिनिधीभगवानराव मस्के):

वनविभाग कार्यालय हिंगोली अंतर्गत मागील १९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या वनमजूर महिला कर्मचाऱ्यांचे तब्बल ६ महिन्यांपासून वेतन रखडले आहे. यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ६ एप्रिलपासून कडक उन्हात उपोषण सुरू केले आहे.

उपोषणाला सुरुवात होऊन अनेक दिवस उलटूनही संबंधित महिलांना अद्याप रखडलेले वेतन मिळालेले नाही. तसेच, त्यांच्या मागण्यांकडे कोणताही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी गांभीर्याने लक्ष देत नसल्याची खंतही महिलांनी व्यक्त केली आहे.

उपोषणात सहभागी झालेल्या महिलांमध्ये संजीवनी कुऱ्हे, चंदा खिल्लारे, शेख अफसाना, द्वारकाबाई मनवर, रेखाबाई रणवीर, कुसुंबाई कांबळे, गंगासागर दिपके, कौशल्या दांडेकर, शोभाबाई दुधमल, ललिता कांबळे, बबिता कांबळे, शेख रिहाना, करुणा खंदारे, मीना खंडागळे, संगीता डोंगरे आदींचा समावेश आहे.

“आमच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन रखडलेले वेतन द्यावे, अन्यथा आमचे उपोषण सुरूच राहील,” असा इशारा वनमजूर महिलांनी दिला आहे.

वनमजूर म्हणून दीर्घकाळ सेवा देऊनही वेतनासाठी संघर्ष करावा लागत असल्याची नाराजी महिलांनी व्यक्त केली. तसेच, कोणताही अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी भेट देत नसल्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

What's Your Reaction?

Like Like 5
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 1
Sad Sad 0
Wow Wow 0