पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापौर रवि लांडगे यांनी त्यांच्या समतावादी विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर रवि लांडगे यांनी महात्मा बसवेश्वर यांनी दिलेला स्त्री-पुरुष समानता, बंधुता, अहिंसा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळावी, या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निगडी येथील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0