जोगेश्वरीत राष्ट्रवादी (शरद पवार) तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती जल्लोषात साजरी

जोगेश्वरी येथील क्रांती मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला माजी मंत्री जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

Apr 20, 2026 - 14:21
 0  2
जोगेश्वरीत राष्ट्रवादी (शरद पवार) तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती जल्लोषात साजरी
जोगेश्वरीत राष्ट्रवादी (शरद पवार) तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती जल्लोषात साजरी

मुंबई/प्रतिनिधी –उदय कासारे 

जोगेश्वरी येथील क्रांती मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) युवा जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी नगरसेवक व जिल्हाध्यक्ष मा. अजितदादा रावराणे, मा. नगरसेविका रुपालीताई रावराणे, त्रिपूरा फाउंडेशनच्या अध्यक्षा करिष्मा राजेश सुरती, विकासक राजेश सुरती, मुंबई युवक अध्यक्ष अमोलजी मातेले, तसेच अमर कसबे यांची उपस्थिती होती.

या जयंती सोहळ्याचे आयोजन युवा जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला राजेश सकट, विजय कसबे, अब्दुल जमादार, स्वप्नील पाटील, रोहित कसबे, ब्लेस डिसोजा, सुरज मिश्रा, निलेश लोंढे, संतोष बिर्जे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, मान्यवर महिला व मोठ्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0