तीन दिवसांत ४५ हजार चौरस फूट अतिक्रमण हटवले; पिंपरी चिंचवड महानगरपालिका ची धडक कारवाई
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने तीन दिवसांत ४६ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत ४५,२८९ चौरस फूट अतिक्रमण हटवले.
पिंपरी, दि. १८ एप्रिल २०२६ : शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून धडक कारवाई सुरू असून, १५ ते १७ एप्रिल या तीन दिवसांत विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्यात आले.
या कारवाईदरम्यान एकूण ४६ अनधिकृत बांधकामे व पत्राशेड हटवून सुमारे ४५,२८९ चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई राबविण्यात आली.
क्षेत्रनिहाय कारवाईचा आढावा :
‘ब’ क्षेत्रीय कार्यालय (चिंचवड): ९ अनधिकृत बांधकामांवर कारवाई; २१,७९८ चौ.फूट अतिक्रमण हटविले
‘क’ क्षेत्रीय कार्यालय (भोसरी): १० बांधकामांवर कारवाई; सुमारे ३,८११ चौ.फूट क्षेत्र मोकळे
‘ई’ क्षेत्रीय कार्यालय (मोशी/डूडूळगाव): १ पत्राशेड हटवून ६५० चौ.फूट क्षेत्र मोकळे
‘फ’ क्षेत्रीय कार्यालय (चिखली): ८ व्यावसायिक बांधकामांवर कारवाई; ३,६६० चौ.फूट क्षेत्र मोकळे
‘ग’ क्षेत्रीय कार्यालय (रहाटणी व परिसर): १८ बांधकामांवर कारवाई; सुमारे १५,३६९ चौ.फूट क्षेत्र मोकळे
ही कारवाई आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह धडक पथक, पोलीस कर्मचारी व महापालिका यंत्रणा यामध्ये सहभागी होती.
अतिक्रमण हटवण्यासाठी जेसीबी, ब्रेकर, ट्रॅक्टर यांसारख्या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.
महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार असून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0