रश्मी फाउंडेशनच्या ‘अनंत कल्पना डायलिसिस सेंटर’ला एक वर्ष पूर्ण; गरजू रुग्णांना मोफत धान्य किट वाटप
रश्मी फाउंडेशनच्या ‘अनंत कल्पना डायलिसिस सेंटर’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त गरजू डायलिसिस रुग्णांना मोफत धान्य किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमास अभिनेते अरुण कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुंबई: रश्मी फाउंडेशनच्या ‘अनंत कल्पना डायलिसिस सेंटर’ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गरजू डायलिसिस रुग्णांसाठी मोफत धान्य किट वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.
या कार्यक्रमास मराठी अभिनेते व ‘हास्य जत्रा’ फेम श्री. अरुण कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते रुग्णांना धान्य किटचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांना मानसिक आधारही दिला.
कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून गरजू रुग्णांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
रश्मी फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे समाजात सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होत असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0