पुणे महापालिकेत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा; कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश
पुणे महानगरपालिकेत माननीय महापौर यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. नालासफाई, आपत्ती व्यवस्थापन, रस्ते आणि पर्यावरण विभागाच्या कामांचा आढावा घेत सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
दि. २३ एप्रिल २०२६ पुणे महानगरपालिकेत माननीय महापौर यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (ज) श्रीमती कौर, अतिरिक्त आयुक्त (इ) प्रजित नायर तसेच विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते.
बैठकीत पावसाळ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मलनि:सारण विभागाच्या मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पुणे शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत सुरू असलेल्या नालासफाईच्या कामांची प्रगती तपासण्यात आली.
तसेच NDMA अंतर्गत केंद्र सरकारकडून पुणे महानगरपालिकेस मंजूर प्रकल्पांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन विभाग, रोड विभाग, पर्यावरण विभाग आणि इतर संबंधित विभागांच्या कामांबाबतही चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या शेवटी सर्व खाते प्रमुखांना सुरू असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागू नये, यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी आणि शहरातील पायाभूत सुविधा सक्षम ठेवण्यासाठी महापालिकेने मान्सूनपूर्व तयारीला वेग दिल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0