पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मंजुरी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, स्वच्छता यांसह विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली.

Apr 24, 2026 - 01:38
 0  1
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मंजुरी
स्थायी समिती बैठक, अभिषेक बारणे, विकासकामे, आरोग्य सुविधा, शिक्षण, स्वच्छता, पायाभूत सुविधा

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. २२ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती सभा सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधूकर पवळे सभागृहात पार पडली. या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पायाभूत सुविधा यांसंदर्भातील अनेक महत्त्वाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये आकुर्डी हॉस्पिटलमधील फायर सेफ्टी ऑडिटनुसार कामे, विविध भागांमध्ये कचरा संकलन व जनजागृती, मनपा शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण, स्मार्ट फिटनेस उपकरणांची खरेदी, बोअरवेल दुरुस्ती व नवीन उभारणी, विविध प्रभागांतील रस्ते, नाले, फुटपाथ व जलनिस्सारण कामे, तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक देखभाल यांचा समावेश आहे.

तसेच शहरातील मैला शुद्धीकरण प्रकल्प, रुग्णालये, नाट्यगृह आणि शाळांमध्ये फायर सेफ्टी ऑडिटनुसार सुधारणा करण्याचे काम, स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत प्रकल्प राबविण्यासाठी एजन्सी निवड, तसेच डिजिटल प्रणाली विकसित करण्यासही मंजुरी देण्यात आली.

महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी जाहिरातींचा वापर, उद्यान विभागासाठी वेब व मोबाईल आधारित प्रणाली, तसेच विविध विभागांमध्ये आधुनिकीकरणाच्या उपाययोजना यांनाही हिरवा कंदील देण्यात आला आहे.

“शहराच्या शाश्वत विकासासाठी आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आजच्या सभेत आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रलंबित कामांना गती देण्यात आली आहे. पारदर्शक कारभार आणि वेळेत काम पूर्ण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”

– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0