धडधडत्या उन्हात फटाक्यांच्या गाडीला भीषण आग; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात कासोळा बसस्थानकाजवळ फटाक्यांनी भरलेल्या मालवाहू वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली. वाहन जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Apr 24, 2026 - 23:06
 0  43
धडधडत्या उन्हात फटाक्यांच्या गाडीला भीषण आग; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली
यवतमाळ बातमी, महागाव आग, फटाक्यांची गाडी आग

यवतमाळ प्रतिनिधी- रवी वाघमारे 

राज्यात उन्हाचा कडाका वाढत असतानाच यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. कासोळा बसस्थानकाजवळ फटाक्यांनी भरलेल्या धावत्या मालवाहू वाहनाला आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक लेलँड कंपनीचे ‘छोटा हत्ती’ वाहन फटाक्यांची मोठी खेप घेऊन पुसदच्या दिशेने जात होते. कासोळा बसस्टॉपजवळ पोहोचताच वाहनाने अचानक पेट घेतला.

उन्हाची तीव्रता आणि वाहनात असलेल्या ज्वलनशील फटाक्यांमुळे काही क्षणांतच आगीने संपूर्ण गाडीला वेढले. भररस्त्यात फटाक्यांचे मोठे स्फोटसदृश आवाज आणि आगीचे लोळ दिसताच नागरिकांची पळापळ झाली.

वाहतूक ठप्प, वाहनांच्या रांगा

या घटनेमुळे महागाव-पुसद मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान राखून सर्वांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

मोठी जीवितहानी टळली

सुदैवाने या भीषण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मालवाहू वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.

उन्हाळ्याच्या दिवसांत ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0